Ad will apear here
Next
‘प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडावी’
संविधान जागर सप्ताहात अरुण खोरे यांचे प्रतिपादन


पुणे : ‘प्रसारमाध्यमांकडे विचार स्वातंत्र्य आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, प्रसारमाध्यमांनी लोकशाही मूल्ये जपणारी भूमिका मांडायला हवी,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संपादक अरुण खोरे यांनी केले. ‘माध्यमांचे व्यापारीकरण होत असताना मूल्ये जपणारी माध्यमे आपले वेगळेपण टिकवून असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीतर्फे आयोजित संविधान जागर सप्ताहात ‘भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात झालेल्या या संविधान कट्ट्यावर ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, धर्मराज निमसरकर, संयोजक परशुराम वाडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

खोरे म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा खांब असे म्हटले जात असले, तरी त्याला संविधानिक आधार नाही. सध्या माध्यमे मालकांच्या हाती असल्याने आर्थिक शक्तींचा विळखा पडल्याचे चित्र दिसते; मात्र, पत्रकारांनी ठामपणे भूमिका घेत सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे; तसेच लोकांच्या हिताचे लेखन करण्यासह विरोधकांची भूमिका निभावता आली पाहिजे. हे करताना मूल्ये सोडून काम करू नये.’

आवटे म्हणाले, ‘सोशल मीडियामुळे प्रसारमाध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. अनेक माध्यमसमूह उद्योजकांच्या हाती असल्याने वेगळी भूमिका मांडता येत नाही. नागरिकांचा अंकुश प्रसारमाध्यमांवर राहिला, तर त्यांना तटस्थपणे भूमिका मांडावी लागेल. संविधानाला अनुसरून पत्रकारांनी भूमिका मांडायला हवी. व्यक्तिसापेक्ष विरोधापेक्षा मूल्यांवर आधारित भूमिकेला आपण महत्त्व दिले पाहिजे.’

परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. धर्मराज निमसरकर यांनी सूत्रसंचालन केले. शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZMRBU
Similar Posts
पुणेकर धावले संविधानासाठी आणि समतेच्या न्यायासाठी पुणे : ‘एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी...एक धाव आपल्या संविधानासाठी’ असा उद्घोष करत पुणेकर २५ नोव्हेंबरला सकाळी संविधानाच्या सन्मानासाठी धावले. निमित्त होते, भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान समितीतर्फे संविधान जागर सप्ताहाअंतर्गत आयोजित संविधान दौडचे.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे (प्रीएम्बल) भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आझम कँपस येथे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला.
आंबेडकर संघर्ष समितीतर्फे संविधानाच्या प्रतींचे वाटप पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. भारतीय संविधान जनमानसात पोहोचावे, यासाठी दर वर्षी संविधान दिनाच्या निमित्ताने समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांना, तसेच
‘वंचितांच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळावा’ पुणे : ‘आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. वंचितांसाठी झटणाऱ्या चांगल्या प्रवृत्तीही समाजात आहेत. त्यामुळे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language